आसावरी माझी मामी, स्वेटर विणून दे, फरच्या बाहुल्या कर पेंटिंग कर, ड्रेस डिझाईन करून दे इत्यादी. सगळ्यात तरबेज, अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व, तिला वेगवेगळे पदार्थ करून खिलवण्याचा छन्द, म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन नव्हे तर पंजाबी, साऊथ इंडियन, कॉन्टिनेन्टल डिशेश करण्यात ती पारंगत, मामी कधी आईकडे आली तर काही तरी खास खाऊ घेऊन यायची, आईला तिचे खूप कौतूक असायचे. अधून मधून मी माहेरी गेली तर तिच्या चवीचे खायला मिळायचे. आसावरी मामीने फक्त उंचीत मार खाल्ला, शाळेत असताना मला आठवते ती आली कि आम्ही मुद्दाम तिच्या शेजारी उभे राहायचो, कदाचित आपण उंच आहोत असे उगाचच समाधान वाटत असावे. पण तिने कधी आमचा राग केला नाही उलट कौतुकाने म्हणायची, “वा. चांगलीच उंच झालीस.”
माझ्या मोठ्या नणंदेच्या मुलाचे लग्न ठरले, बदलापूरची मुलगी होती. त्यामुळे लग्न बदलापूरमध्येच, मध्यंतरी मामीच्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्या नंतर कल्याणचा फ्लॅट मुलाच्या नावाने करून मामा मामी त्यांच्या बदलापूरच्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्याचे कळले होते. मी मनात ठरवले कि मामीला वेळात वेळ काढून भेटायचे. मी गेले  तेंव्हा मामी स्वयंपाक खोलीत बिझी होती. मामीशी बोलायला मी आत गेले आणि थबकलेच, मामी पाटावर उभे राहून चकल्या तळत होती. मी पटकन ओरडूनच विचारले, अगं, तू अशी पाटावर उभी राहून काय काम करतेस, पाट सरकला म्हणजे? मामी पण हसतच म्हणाली, ‘काय करणार, उंचीत मार खाल्ला, मी म्हणाले, ‘अग पण किचन प्लॅटफॉर्म का नाही करून घेतलास तुझ्या टाईपचा. ती म्हणाली. अग माझ्यासारख्या कमी उंचीच्या बायका कमी असतील, मग खास आमच्यासाठी कोण बनवणार? ते जाऊ देत म्हणत मामीने विषय बदलला. आम्ही गप्पा मारल्या, मी घरी जायला निघाले, मला चकलीचे पाकीट, एक पेंटिंग केलेली फ्रेम गिफ्ट दिली. मी तिथून निघाले पण मन अस्वस्थच होते, पण काही गोष्टी आपल्याला जाणवतच नाहीत. मी ठरवले कि ह्यावर आपण काहीतरी तोडगा काढायचा. दोन-तीन कंपन्यांना फोन केला, नेट सर्फिंग करताना अधिरा ची माहिती दिसली, त्यांना फोन केला. त्यांनी माझी गरज समजून घेतली आणि मला आश्वस्त केले. मी रविवारी मामे-भावाला फोन करून सर्व गोष्टी कानावर घातल्या. त्याला माझा विचार पटला, मी त्याला ‘अधिरा’ ची माहिती पाठवली, त्याने मला धन्यवाद दिले. काही दिवसांनी मामीचा फोन आला. तिने मला सवाष्ण भोजनाचे आमंत्रण दिले, त्या निमित्ताने तु माझे नवीन किचन बघशील असे म्हणताना तिला झालेला आनंद जाणवत होता. बहुतेक महिला आपल्या गैरसोयी सांगत नाहीत, निमूटपणे सहन करत गैरसोयी त्यांच्या अंगवळणी पडतात. आला दिवस साजरा करतात. पण आता निदान सोयीच्या किचनसाठी आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम वर अधिरा टाईप करा आणि माहिती जाणून घ्या आपल्या आप्त, मित्र परिवारास शेअर करा. अधिरा-हर माँ कि पसंद अधिरा किचन!
Enquire Now
close slider