पती, सासू, सासरे, दिर आणि आजे सासुबाई अशा एकत्र कुटुंब पद्धतीत रहाणाऱ्या अंजनीच्या आजेसासूबाईंची कहाणी.  जरी त्यांचा जन्म गेल्या शतकातील असला तरी  विचाराने त्या प्रगल्भ आहेत. त्यांचे घराकडे लक्षही बारीक असते, कधीकधी त्याचा कुटुंबाला फायदाच होतो.  छोट्या छोट्या कामात त्यांची मदतही होते. पहिल्यांदा त्या नऊवारी साडी नेसायच्या आता त्यांच्या भाषेत त्या गोल साडी नेसतात. पण सुनेला ड्रेसचे बंधन नाही.  सडपातळ बांधा, गोरा रंग, टापटीप आणि स्वच्छ राहणी, अतिशय शिस्तशीर, वेळच्या वेळी जेवण. त्यांच्या विषयी वाटणारा आदर आणि जिव्हाळा यामुळे घरालाही शिस्त आहे. अंजनी आणि तिच्या सासूबाईंची होणारी तारेवरची कसरत त्या रोज बघत असत. त्यात पाहुणे आले की जास्त काम पडत असे. त्यात त्यांचे किचन जुने त्यामुळे काहीही ऑर्गनाईज नव्हते. किचन साफसफाई म्हणजे अख्खा दिवस जायचा आणि दमायलाही व्हायचे. त्या सारख्या म्हणायच्या किचन बदलून घ्या, माझी काळजी वाटत असेल तर मी जाईन यमीकडे महिनाभर राहायला. त्यांच्या सगळ्यात धाकट्या बहिणीचे नाव यमुना उर्फ यमी. अंजनीला ही बरेच वेळा वाटायचे कि एवढे पैसे कमवतो तर घर रिनोव्हेट करायला काय हरकत आहे? अंजनीने आपल्या पतीला सांगून बघितले त्यावर त्याचे उत्तर ठरलेले असायचे, आई बघेल काय करायचे ते. घरात एक दिवस सासरे आणि दीर घरी होते, आजी दोघांना म्हणाल्या, मला तुमच्याशी ५ मिनिटे बोलायचे आहे, आपले काहीतरी चुकले असणार असे समजून दोघेही मनातून घाबरले होते. त्यांनी मुलाला विचारले, ‘काय रे गेल्या महिन्यात तू कितीला गाडी बुक केलीस ? आणि आदित्यने परवा काय म्हणतात ते मॅक बुक घेतले ते कितीला होते ? तुम्हाला दोघांना सगळे कसे ब्रॅण्डेड लागते. मग त्यासाठी तुम्ही तात्पुरतं कर्ज काढता, नाहीतर त्यासाठी पैशाचे प्लांनिंग आधीपासून असते.  पण एक गोष्ट ज्यामुळे आपल्या सगळ्यांचे पोट भरते, आपल्याला वेळच्या वेळी खायला मिळते त्या किचनकडे तुमचे लक्ष आहे का? का तो तुमचा एरिया नाही. फक्त छान पदार्थ खायला मिळतात त्यामुळे तुम्ही संतुष्ट.  अरे त्यांची दोघींची होणारी ओढाताण मी रोज बघते पण तुमचे मनसुबे ऐकून त्या मूग गिळून गप्प आहेत.  आता कर्ज काढा काहीही करा पण चांगले सोयीचे किचन करायला पहिले प्राधान्य द्या आणि हो किचन कसे पाहिजे ते त्यांच्या मनाप्रमाणे करा नाहीतर तिथे तुमचा हात आखडता घ्याल.
मग काय, मी आणि सासूबाईंनी सर्फिंग करायला सुरुवात केली, आणि साथीला आजे सासूबाई होत्या. अधिरा किचन आम्हाला सर्वच दृष्टीने योग्य वाटले, कंपनीचा माणूस आला आणि त्यांनी आम्हाला नीट सगळ्या गोष्टी समजावल्या, आजी पण खुश झाल्या आणि जेव्हा त्यांनी सांगितले कि त्यांच्या फॅक्ट्रीत किचन बनणार आणि नंतर फक्त फिटिंग आमच्या घरी होईल ह्यामुळे तर आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आमच्याकडे अधिरा किचन बसले. आमच्या ग्रेट आजी आणि ग्रेट अधिरा किचन, आता आम्हाला हि पटले, ‘हर माँ कि पसंद अधिरा किचन’.
तुम्हीही आजच फेसबुक किंव्हा इंस्टाग्राम वर जा आणि अधिरा टाईप करा आणि अधिरा विषयी जाणून घ्या….
Enquire Now
close slider