शिवाजी पार्क एरियात माझे बालपण गेले, शिक्षण दादरच्याच शाळेत, रुपारेल कॉलेजची विद्यार्थी होते. बँकेत नोकरी लागली आणि वर संशोधनास सुरुवात झाली. शिवाजी पार्क, दादर ह्यापलीकडे जग जवळपास माहितच नव्हते. पण आयुष्याचा साथीदार मात्र घोडबंदर, ठाणे येथील रहाणारा मिळाला.
नाही म्हटले तरी थोडं टेन्शन होतं. नवीन नातेसंबंध, नवीन शहर, मुलींचे सगळं आयुष्यच लग्नानंतर बदलून जात. लग्नाआधी साडी, ज्वेलरी इत्यादी खरेदीसाठी ठाण्यात येणे -जाणे वाढले. त्यांच्या घराचे नूतनीकरण करण्याचे ठरले तेंव्हा सासूबाईंनी मला येण्याचा आग्रह केला, नूतनीकरण करताना माझ्या पसंतीला प्राधान्य देता येईल आणि माझे त्यांच्याकडील नातेसंबंध अधिक दृढ होतील हा त्यांचा हेतू होता. त्यांचे विचार ऐकूनच मी आणि माझी घरची मंडळी मनात सुखावलो. आम्ही ठाण्यातील काही दुकाने पालथी घातली, ‘अधिरा’ बद्दल मी फेसबुक वर वाचल्याचे सासूबाईंना सांगितले आणि आमची गाडी अर्थात ‘अधिरा’ कडेच वळली.
आम्ही ‘अधिरा’ ला बघितले आणि आम्हा सासू सुनांचे ‘अधिरा’ बाबत एकमत झाले. मी खूप खुश होते, कधी एकदा घरी जाते आणि आईला सांगते असं झाले…अधिरा चे वर्णन करत असताना आई माझ्याकडे कौतुकाने बघत होती. माझ्याप्रमाणे तुमच्या संसाराची सुरुवात गोड व्हावी असे वाटत असेल तर अधिराला भेटाच, तिची माहिती जाणून घ्यायची असल्यास फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ‘अधिरा’ (Adhira) टाईप करा आणि बाकीच्यांना ही शेअर करा…क्योंकि  #हर_माँ_कि_पसंद_अधिरा_किचन….
Enquire Now
close slider