आकाश आणि अवनी, दोघेही मल्टी नॅशनल कम्पनित कामाला आहेत. दोघांचे ठरवून लग्न होते. नोकरी निमित्त दोघेही मुंबईत भाड्याच्या घरात आपल्या मित्र मैत्रिणी समवेत राहत होते. लग्न झाल्यावर मात्र दोघांनी घाटकोपर पूर्वेला जुना १ बीएचके फ्लॅट विकत घेतला. कर्ज काढून फ्लॅट घेतला असल्याने हप्ते चालू होते त्यामुळे फक्त रंग आणि टॉयलेट बाथरूम चे काम करून लग्नानंतर लगेचच ते राहायला गेले. आला दिवस ढकलत ३ वर्षे कधी गेली ते त्यांना कळलच नाही. आता पगार पण वाढला होता त्यामुळे त्यांनी फ्लॅटचे रिनोव्हेशन करण्याचे ठरविले. पहिला बदल आवश्यक होता तो किचनचा आणि काही फर्निचर पहिले किचन बदलायचे आणि मग नंतर बाकीचे असे ठरले. किचनचे कोटेशन २/३ लोकांकडून मागवले. त्यात बोलण्यात प्रामाणिक, मवाळ आणि माफक दर त्यामुळे त्यांनी एकाला फायनल केले. ५५-६० दिवसात तुमचे किचन नक्की होईल असे आश्वासन दिल्याने आकाशने अगोदर महिनाभर सुट्टी घ्यायची आणि अवनीने पुढचे महिनाभर सुट्टी घ्यायची असे ठरविले. रॅजेचा अर्ज पास झाला. आता सर्व सुरळीत पार पडेल ह्या कल्पनेने दोघेही खुश होते. काही त्या काँट्रॅक्टर ने सुचवल्याप्रमाणे काही त्या कॉट्रॅक्टर ने सुचवल्याप्रमाणे काही अवनी ने सांगितल्याप्रमाणे एकूण किचन चे रफ डिझाईन्, डोअर्स, ड्रॉव्हर्स, हॅन्डल्स इत्यादी सगळे कागदोपत्री फायनल झाले.

 

किचन चे मट्रियल त्या त्या दुकानात जाऊन फायनल झाले. ५०% आगाऊ रक्कम सामान आणण्याकरिता दिली. तोपर्यंत सगळे सुरळीत होते. ठरल्याप्रमाणे पहिल्यांदी आधीचे किचन पाडायला सुरवात झाली. नंतर जवूळ जवळ १० दिवस वायरमन, प्लंबर, काढिया येऊन नुसते माप घेऊन जात होते. काम म्हणावे तसे पुढे सरकत नव्हते. आकाशला हळूहळू अंदाज येतो कि ठरल्याप्रमाणे हे काम होत नाही. काँट्रॅक्टरला एकदा समजावण्याच्या सुरात एक कडक शब्दात समजवून काही उपयोग होत नाही. त्याच्या सबबी नेहमी तयारच असायच्या. पैसे दिल्याने आता काही करता पण यायचे नाही. आकाशची रजा संपली आणि तो कामावर जायला लागला. ठरल्याप्रमाणे अवनीची रजा चालू होते. फर्निचरचा आवाज, ठाकाठोक रोज चालू असे. किचनचा सांगाडा उभा राहतो आणि बाकीचे सामान येऊन पडलेले असते. मधूनच कारागीर रजेवर जात. सगळीकडे, धूळ, कचरा, रोजची साफसफाई, कॉन्ट्रॅक्टरच्या काम न होण्याच्या सबबी त्यामुळे कंटाळलेली अवनी चिडून आकाशला फोन करून सांगते, ‘२ दिवसांत काम झाले नाहीतर मी माहेरी निघून जाईन.’ कशीबशी तिची समजूत काढून परत आकाश रजा घेतो. असं करता करता जवळ जवळ ३ महिन्याने त्यांचे किचनचे काम पूर्ण होते. घरात रोज पडत असलेला कचरा, मनस्ताप, रजा संपते, मग विदाउट पे, जवळपास तीन महिने बाहेरचे खाणे एकूणच किचन बघावे करून असा अनुभव दोघांना येतो. तुमच्याकडे किचन करायचे असल्यास हा सर्व प्रकार टाळण्यासाठी तुम्ही पूर्णतः मॉड्युलर किचनचा विचार करा आणि त्यासाठी तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जा आणि ‘अधिरा’ टाईप करा आणि अधिरा विषयी जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. कारण… हर माँ कि पसंद ‘अधिरा’ किचन.

Enquire Now
close slider